बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. राज्यात दररोज ६० हजाराच्यावर कोरोना चाचण्या केल्या जातात. दरम्यान वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी इतर राज्याच्या तुलनेत कर्नाटकात कोरोनाच्या दररोज ७५ हजार चाचण्या होत असल्याचे म्हंटले आहे. यामुळे राज्यात अधिक बाधितांची नोंद झाल्याचे दिसते. आतापर्यंत केरळमधील चाचण्या कमी असल्याने कोरोना प्रकरणांची संख्या कमी होती. वाढत्या चाचणी क्षमतेमुळे केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या तुलनेत कर्नाटकमध्ये कोरोना नियंत्रणात असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान डॉ. के.सुधाकर यांनी डॉक्टर आंदोलन मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. मंत्री सुधाकर हे डॉ. बी. आर. आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालय, कोडुगोंडनाहळ्ळीयेथे एमडीएल प्रयोगशाळा आणि प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री मंत्री सुधाकर यांनी पगाराच्या दुरुस्तीसंदर्भात आतापर्यंत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत, ही डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे. त्यांनी बैठकींच्या ठरावावर सहमती दर्शविली असली तरी आंदोलन सुरूच ठेवणे मान्य नाही, असे ते म्हणाले. कोरोना विरूद्ध लढण्याच्या वेळी डॉक्टरांनी केलेल्या भूमिकेला खूप महत्त्व आहे. त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार विचार करत आहे. कर्नाटक शासकीय वैद्यकीय अधिकारी ’संघटनेचे पदाधिकारी संप मागे घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रुग्णालयात पुरेसे बेड असले तरी राज्यात व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड आवश्यक आहेत. हे प्रकरणांच्या तीव्रतेनुसार वाढविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नेलामंगला येथील कोविड केअर सेंटर बंद केल्याचा उल्लेख करीत त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही असे आश्वासन दिले. परिस्थिती पाहून मागणी केल्यास कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले जाईल, असेही ते म्हणाले.