बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील कोरोनाचा रुग्णवाढीचा वेग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता दिवसा कोरोनाचे दहा हजार रुग्ण सापडत आहेत. बुधवारी, गुरुवारी राज्यात दहा हजाराहून अधिक नवीन कोरोनासंसर्गग्रस्त रुग्ण आढळले आहेत. दरम्यान गुरुवारी राज्यात १०,७०४ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाने १०१ जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच राजधानी बेंगळूरमध्येही कोरोन बाधितांची संख्या वाढत असून गुरुवारी पाच हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण सापडले. बेंगळूर जिल्ह्यात ५,१२१ नवीन रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी ९६१३रुग्ण कोरोना मुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे १,१७,१४३ सक्रिय रुग्ण आहेत