बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. राज्यात सध्या ५० हजारापेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात शनिवारी २,०८२ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर ७,७५१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात शनिवारी ८६ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. शनिवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.३४ टक्के होते. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४८,११६ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी ४८१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर याचवेळी ४,४८४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात १० कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.