बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली. राज्यात गेल्या २४ तासात ९,८६० नवीन रुग्णांची भर पडली आहे. यासह, राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या ३,६१,३४१ वर पोहचली. यापैकी २,२६,९१३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ९४,४५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी ६,२८७ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आली.
राज्य आरोग्य विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी ११३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत राज्यात ५,९६९ रुग्ण मरण पावले आहेत. यापैकी १९ रुग्णांचा मृत्यू कोरोना व्यतिरिक्त आजाराने मृत्यू झाला आहे. राज्यात आयसीयूमध्ये ७५१ रुग्ण दाखल आहेत.