बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात सोमवारी ६,८३५ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली. तर राज्यात १२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी १५,४०९ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत एकूण २७,७१,९६९ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी २५,६६,७७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत ३३,०३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १,७२,१४१ इतकी आहे. सोमवारी राज्यात सकारात्मकता दर ४.५६ टक्के आणि प्रकरणातील मृत्यू दर १.७५ टक्के होता, असे आरोग्य विभागाने सांगितले.
दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनीची १,४७० नवीन प्रकरणे नोंदवली गेली. जिल्ह्यात १ जून रोजी २७६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान जिल्ह्यात मृतांच्या संख्येत घट झाली आहे. राज्याच्या राजधानीत आतापर्यंत ११,९८,१५८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात सध्या ८५,०४४ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १५,३१९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे