बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण मृतांचा आकडा ३७ हजारांच्या पार गेला आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात मागील २४ तासात कोरोनामुळे २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात सोमवारपर्यंत एकूण मृतांची संख्या ३७,००७ वर पोहोचली आहे.
राज्यात नवीन २८ मृत्यूंपैकी ५ रुग्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आहेत, तर इतर बेंगळूर शहरी, म्हैसूर जिल्यात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हसन, कोडगू जिल्ह्यात ३, चित्रदुर्ग, कोलार आणि उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रत्येकी २ असे मृत्यू झाले आहेत.
सोमवारी राज्यातील केस मृत्यू दर (सीएफआर) २.६२ टक्के होता, तर दिवसासाठी चाचणी सकारात्मकता (टीपीआर) दर ०.९३ टक्के होता. दरम्यान, राज्यभरात १,०६५ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली असून यासह एकूण कोरोना रुग्णांची संख्या २९,३०,५२९ झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या २२,०४८ आहे.