बेंगळूर/कर्नाटक
कर्नाटकमध्ये कोरोने गुरुवारी नवा विक्रम नोंदला. राज्यात एकाच दिवसात ४१६९ नागरिकांना कोरोना झाल्याचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी बंगळूरमध्ये २३४४पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. राज्यात गुरुवारी कोरोनाने एकूण १०४ लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी ७० जण बेंगळूर मधील आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनाची एकूण सक्रिय प्रकरणे ३०६५५ वर गेली आहेत.
गुरुवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात २३४४, दक्षिण कन्नड जिल्ह्यात २८८, धारवाड जिल्ह्यात १६६, विजयपूर जिल्ह्यात १४४, कलबुर्गी जिल्ह्यात १२३, उडुपी जिल्ह्यात ११३, रायचूरूमध्ये १०१, बेळगावमध्ये ९२, उत्तर कन्नडमध्ये ७९, चिकबल्लापूरमध्ये ७७, बिदरमध्ये ५३, शिवमोगा जिल्ह्यात ४६, बळ्ळारीमध्ये ४४, गडाग जिल्ह्यात ४४, कोलारमध्ये ४३, बागलकोटमध्ये ३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच यादगिरी जिल्ह्यात ३४, कोपळमध्ये ३२, हसनमध्ये ३१, बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यात ३१, चिकमगळूरमध्ये ३०, दवाणगिरी जिल्ह्यात २५, चित्रदुर्ग जिल्ह्यात २१ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन चिंतेत पडले आहे.