बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात बुधवारी १,२२४ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २९.४२ लाखांवर पोहचली आहे. तर राज्यात बुधवारी २२ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३७,२०६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासात राज्यात १,६६८ रुग्णांना कोरोनमुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला, ज्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या २८,८५,७०० झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १९,३१८ इतकी आहे. दरम्यान, राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात जास्तीत जास्त ३०९ प्रकरणे आणि ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केरळच्या सीमेला लागून असलेला दक्षिण कन्नड जिल्ह्यात २१७ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली. तर ६ मृतांची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्येही उडुपी १३०, म्हैसूरू १०२, हसन ९५) आणि तुमकूर ५२ यासह नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
युरोप, मध्यपूर्वेतील हवाई प्रवाशांसाठी RT-PCR आवश्यक नाही
कर्नाटक सरकारने युनायटेड किंगडम, इतर युरोपियन देश आणि मध्य पूर्वमधील प्रवाशांना राज्य विमानतळांवर अनिवार्य कोरोना आरटी-पीसीआर चाचण्यांमधून सूट दिली आहे. या देशांतील प्रवासी नमुने प्रदान करू शकतात आणि मानक ऑपरेटिंग प्रक्रियेनुसार ते विमानतळ सोडू शकतात.