बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजारांवर पोहोचली आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,६३९ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली. तर २,२४१ रुग्ण कोरोनावर विजय मिळवून रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात कोरोनाने बुधवारी ३६ रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,८८,३४१ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८,२६,४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,२६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २५,६४५ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ४१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर याचवेळी ९६३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात ७ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.