बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सोमवारी राज्यभरात कोरोना लसीचे तब्बल ७,१८,४९८ डोस दिले गेले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये कर्नाटक लसीचे १ कोटी डोस देणार असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाच्या एक दिवसानंतर कोरोना लसीकरणामध्ये वाढ झाली आहे.
कर्नाटक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बेळगावमध्ये रात्री ९ पर्यंत ८०,५०४ लसीकरणासह सर्वाधिक लसीकरण झाले, तर बेंगळुरूच्या बीबीएमपी हद्दीत आणखी ६९,१२८ डोस दिले गेले. दरम्यान सोमवारच्या तुलनेत राज्यात २१ जून रोजी जास्त लसीकरण झाले होते. त्यावेळी १० लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली होती.