बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळत आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४५ हजारापेक्षा कमी आहे. राज्यात गेल्या २४ तासात २,८४८ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर ५,६३१ रुग्णांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात सोमवारी ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.९४ टक्के होते. तर मृत्यू दर ३.३५ टक्के होता.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ५२० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर याचवेळी ३,१३६ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात ७ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८.५६ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २७,७९,०३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३५,४३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४१,९९६ इतकी आहे.