चेन्नई/प्रतिनिधी
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी शुक्रवारी दिवाळीनंतरही कर्नाटकात जाण्यासाठी बसेसना परवानगी असेल असे जाहीर केले.
25 मार्चपासून कोरोना प्रसारामुळे बस सेवा बंद आहेत.
दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येद्दियुरप्पा यांनी पलानीस्वामी यांना पत्र लिहून आंतरराज्यीय प्रवासात सवलत मिळावी, जेणेकरून लोकांना दिवाळीसाठी त्यांच्या कुटुंबियांना भेटता येईल असे म्हंटले होते. त्यानंतर, टीएन सरकारने गेल्या आठवड्यात ११ ते १६ नोव्हेंबर दरम्यान कर्नाटकला बस सेवेला परवानगी दिली आहे.
शुक्रवारी, पलानीस्वामी यांनी जे लोक व्यवसाय करण्यासाठी शेजारच्या प्रदेशात जाऊ इच्छितात त्यांना देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करता येईल. तसेच कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.