बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगर पालिका (बीबीएमपी) हद्दीत काम करणाऱ्या फ्रंट-लाइन कामगारांना दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दरम्यान या कोविड लसीकरणाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. बीबीएमपी मुख्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात महानगरपालिका प्रशासक गौरव गुप्ता आणि आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांना लसीकरण करण्यात आले. यावेळी विशेष आयुक्त राजेंद्र, जे. मंजुनाथ, रणदीप, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विजेंद्र इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी बोलताना गुप्ता यांनी लसीकरणाचा दुसरा टप्पा सर्व आघाडीच्या कामगारांसाठी आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांना लस देणे आवश्यक आहे. लोकांना लसबद्दल जागरूक केले पाहिजे. लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, ते स्वतः आणि आयुक्त लसीकरण करीत आहेत., असे ते म्हणाले.
गुप्ता यांनी कोरोना लसीबद्दल लोकांना अनेक शंका आहेत. यावर मात करण्यासाठी बीबीएमपीने पुरेशी पावले उचलली आहेत आणि लोकांना बोर्डाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत याची ग्वाही त्यांनी दिली. लसीकरणासाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल लोकांना माहिती दिली जाईल. लोकांचा गोंधळ दूर झाला पाहिजे.