बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दोन महिन्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या दोन महिन्यांत बहुतेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. कोरोनाची ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ७९.३७ टक्के प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
30 सप्टेंबरपर्यंत राज्यात एकूण ६,०१,७६७ रुग्णांपैकी ऑगस्टमध्ये ३६.२७ टक्के म्हणजेच २,१८,३०४ रुग्ण आणि सप्टेंबरमध्ये ४३.५९ टक्के म्हणजेच २,५९,३४४ रूग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ८,८६४ रुग्ण मरण पावले आहेत. त्यापैकी ७४.१९ टक्के म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ६,५७७ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. ऑगस्टमध्ये ३८.३५ टक्के म्हणजेच ३४०० रूग्णांचा मृत्यू झाला. तर सप्टेंबरमध्ये ३५.८४ म्हणजे ३,१७७ रुग्ण मरण पावले आहेत.