बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात सोमवारी कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठी घट झाली. राज्यात सोमवारी १,२८५ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. याचवेळी १,३८३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर कोरोना संसर्गामुळे २५ लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनाच्या एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये काही प्रमाणात घट झाली. दरम्यान, राज्यात सध्या कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या २४०२१ इतकी आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ०.९६ टक्के आहे.
एकीकडे कर्नाटकाच्या शेजारील राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने दक्षता घेतली आहे. सीमेवर कडक तपासणी केली जात आहे. तसेच महाराष्ट्र आणि केरळ मधून येणाऱ्या नागरिकांना नकारात्मक कोरोना अहवाल बंधनकारक केला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेंगळूर शहरी जिल्ह्यात २९० जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. याचवेळी सोमवारी १६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर स संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.