बेंगळूर/प्रतिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत होती. ऑक्सिजनसाठी राज्याने केंद्राकडे मदत मागितीला होती. त्यानुसार कर्नाटकाला १२० टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन आलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस मंगळवारी बेंगळूर शहरात पोहोचली. दक्षिण पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १२० टन वजनाच्या सहा क्रायोजेनिक कंटेनरसह ऑक्सिजन एक्सप्रेस सोमवारी झारखंडहून निघाली आणि आज सकाळी ती व्हाइटफील्डच्या इनलँड कंटेनर डेपोला आली.
दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनीश हेगडे यांनी सांगितले की, ऑक्सिजन एक्सप्रेसची वेगवान वाहतूक सक्षम करण्यासाठी रेल्वेने सिग्नल फ्री ‘ग्रीन कॉरिडोर’ तयार केले आहे.
“ग्रीन कॉरिडॉर, मालमत्तांची कार्यक्षम देखभाल आणि विकास अधिभारात सूट, व्यस्त हंगाम अधिभार, टर्मिनल अॅक्सेस चार्ज इ. ऑक्सिजन कंटेनर वाहतुकीसाठी अनेक सवलती देऊन रेल्वेने देशभर ऑक्सिजनच्या सुरळीत वाहतुकीत बरीच काळजी घेतली आहे. ,”असे ते म्हणाले.
देशभरातील कोविड रूग्णांना ऑक्सिजन सगतोनो यासाठी एक्सप्रेसद्वारे आतापर्यंत ४७०० मेट्रिक टन ऑक्सिजन वितरित करण्यात आला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. राज्यात दररोज ५० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडत असल्याने परिस्थिती चिंताजनक असल्याने ऑक्सिजनची मागणी अनेक पटींनी वाढत आहे.
दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एका ट्वीट करत, “कोविड -१९ रूग्णांना दिलासा देण्यासाठी # टाटानगर येथील ऑक्सिजन एक्सप्रेस मेडिकल ऑक्सिजनच्या कंटेनरसह ग्रीन कॉरिडोरमार्गे बेंगळूरला पोहोचली आहे, अशी माहिती दिली.