बेंगळूर/प्रतिनिधी
पाचवी ऑक्सिजन एक्सप्रेस गुरुवारी पहाटे १.५५ वाजता बेंगळूरला पोहचली. १८ मे रोजी ही ट्रेन झारखंडच्या टाटानगर येथून कर्नाटकाला येण्यासाठी निघाली हाती. या ऑक्सिजन एक्सप्रेसची जलद वाहतूक सक्षम करण्यासाठी रेल्वेने सिग्नल रहित ‘ग्रीन कॉरिडोर’ तयार केले. ट्रेनमध्ये ८ क्रायोजेनिक कंटेनर होते. प्रत्येक क्रायोजेनिक कंटेनरमध्ये २० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन असा १६० टन ऑक्सिजन या एक्सप्रेसमधून आला आहे.
“आतापर्यंत कर्नाटकला ६४० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन रेल्वेने पुरवठा केला आहे. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी राज्यांना मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने आतापर्यंत१९६ ऑक्सिजन एक्सप्रेस चालवल्या आहेत आणि सुमारे ११,८०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक केली आहे, ‘असे एसडब्ल्यूआरने निवेदनात म्हटले आहे.