बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारने रात्री ९ वाजल्यापासून ते दररोज सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. सध्या कर्नाटकात दररोज रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत रात्रीचा कर्फ्यू आहे. तो आता एक तासांनी वाढविण्यात आला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
राज्यासह सीमाभागातील जिल्ह्यात नाईट कर्फ्यूसह विकेंड कर्फ्यूची अंमलबजावणी होणार आहे. रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत
नाईट कर्फ्यू असणार आहे . तर विकेंड कर्फ्यू शुक्रवारी रात्री ९ ते सोमवारी सकाळी ६ पर्यंत असणार आहे. दरम्यान, सीमाभागातील बेळगाव, बिदर आणि विजापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.