२४ तासात ३,१३० नवीन रुग्णांना कोरोनाची लागण
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये सलग १२ व्या दिवशी नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बरे होणाऱ्या रुग्णाच्या पेक्षा कमी होती. कर्नाटकात सोमवारी ३ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. राज्यात नवीन ३,१३० रुग्णांची भर पडली. तर ८,७१५ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान राज्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८,०५,९४७ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७,१९,५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात सध्या ७५,४२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आरोग्य विभागाने राज्यात सोमवारी १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. आता पर्यंत राज्यात कोरोनाने १०,९४७ जणांचा बळी घेतला आहे. तर राज्यात ९४२ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. राज्यात सोमवारपर्यंत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८९.२८ टक्के, तर मृत्यू दर १.३७ टक्के होता. पॉझिटिव्ह दर ४.७५ टक्के होता.
सोमवारी राज्यात एकूण ६५,८९२ कोविड नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यापैकी ५४,९३७ नमुन्यांची तपासणी आरटी-पीसीआर प्रणालीद्वारे करण्यात आली तर १०,९५५ नमुन्यांची जलद प्रतिजैविक तपासणी करण्यात आली.