बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. मंगळवारी राज्यात १४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात सध्या उपचारात असणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाखाच्या खाली आली आहे. मंगळवारी राज्यात १४,३०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर २९,२७१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच राज्यात ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यात एकूण मृतांची संख्या २९,५५४ वर पोहोचली आहे.
दरम्यान राज्यात आतापर्यंत २६,१८,७३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी २२,९०,८६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या २,९८,२९९ रुग्ण उपचारात आहेत.
दरम्यान, राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मंगळवारी सापडलेल्या १४,३०४ नवीन रुग्णांपैकी ३,४१८ रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यातील आहेत. मंगळवारी जिल्ह्यातील ५,४८३ रुग्ण कोरोनावर विजय मिळवून रुग्णालयातून घरी परतले. तर २७६ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी राज्यात सकारात्मकतेचा दर १२.३० टक्के होता, तर केस मृत्यू दर ३.२४ टक्के होता.