बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये शुक्रवारी कोरोना संसर्गाची ९,२८० नवीन प्रकरणे नोंदली गेली. यासह राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या ३,७९,४८६ वर पोहोचली आहे. यापैकी ९९,१०१ रुग्ण उपचार घेत आहेत तर २,७४, १९६ रुग्णांनी कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे. यातील ६१६१ रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने जरी केलेल्या माहितीनुसार शुक्रवारी राज्यात आणखी ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ६,१७० रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर आयसीयूमध्ये ७८५ रुग्ण दाखल आहेत.
गेल्या २४ तासांत ३१,६४१ जलद प्रतिजैविक आणि ४१,५५१ आरटी-पीसीआर चाचणीसह एकूण ७३,१९२ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ३१,९७,११० लोकांची तपासणी केली गेली आहे. राज्यात गुरुवारी मृत्यूचे प्रमाण १.६२ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ७१.२५ टक्के होता.