बेंगळूर प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली. राज्यात बुधवारी १,६३० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर १,३३३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच १९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यात सध्या उपचारात असणाऱ्या रुग्णांची संख्या २४,८९० इतकी आहे. तर राज्यात एकूण ११,७१४ लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत.
राज्यात सर्वाधिक बाधित रुग्णांची नोंद बेंगळूर शहरी जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्यात सध्या १८,३६० रुग्ण उपचारात आहेत. दरम्यान बुधवारी जिल्ह्यात ९१६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ६०२ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून घरी परतले. तर ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.