बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. राज्यात बुधवारी १,४४० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर ९८३ रुग्णांनी कोरोनावर मत करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तसेच राज्यात विविध जिल्ह्यातील १६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान राज्यात २४,१५० रुग्ण सध्या उपचारात आहेत. तर आतापर्यंत ११,८०८ जणांचा बळी गेला आहे.
दरम्यान राज्यात कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. बुधवारी जिल्ह्यात ७१२ जणांना कोरोनाची लागण झाली. तर १७४ लोक कोरोनावर विजय मिळवत घरी परतले. जिल्ह्यात सध्या १८,३९४ रुग्ण उपचारात आहेत. बुधवारी जिल्ह्यात कोरोनाने १० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात तापर्यंत ४,१५६ जण कोरोनामुळे मृत्य पावले आहेत.