बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील विधान परिषदे पोटनिवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निर्विवाद विजय मिळविला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने ११ जागांवर विजय मिळविला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चांगले यश मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या कर्नाटक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष 1,184 पैकी 498 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय. 58 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1,184 प्रभागांमध्ये मतदान झालं होतं. एकूण 1,184 जागांसाठी निवडणुका झाल्या. यात काँग्रेसनं 498, भारतीय जनता पक्ष (BJP) 437, जनता दल (JDS) 45 आणि इतर 204 जागा जिंकल्या आहेत. मात्र, शहर नगरपरिषदांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. नगरपालिका परिषदेच्या 166 प्रभागांपैकी काँग्रेसला 61, भाजपला 67, जेडीएसला 12 आणि इतरांना 26 जागा मिळाल्या आहेत.