बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत १३० हून अधिक जागा जिंकून भाजपला पुन्हा सत्तेत आणू असे प्रतिपादन केले.
बुधवारी बेंगळूरमधील राज भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, “आतापासून दोन वर्षानंतर भाजप १३० पेक्षा अधिक जागा जिंकून सत्तेत येईल. या दिशेने काम आतापासून सुरू झाले आहे, मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला हमी देतो की २०२३ च्या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत असेल. ”
दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना एक नियोजित भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या आरोग्याची चौकशी केली. “अलीकडेच (वाला) याच्या एका डोळ्यावर लेसर शस्त्रक्रिया झाली आहे आणि दुसर्या डोळ्याचीही शस्त्रक्रिया करण्याची तयारी आहे. यावेळी राज्यपालांशी राजकारणावर चर्चा झाली नाही, ”असे त्यांनी काही प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.