बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात मंगळवारी कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झाली. सोमवारी राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट झाली होती. पण पुन्हा मंगळवारी ही संख्या वाढली. राज्यात मागील २४ तासात कोरोनाचे १,६७४ रुग्ण सापडले. त्याच वेळी, १,३७६ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. तर राज्यात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यासह, कोरोनाच्या एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या पुन्हा वाढली. राज्यात कोरोना सक्रिय रुग्णसंख्या २४,२८० इतकी आहे. राज्यात कोरोना संसर्गामुळे बेंगळूरमध्ये सात आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू झाला.
राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १.३८ टक्के आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३०७ नवीन रुग्णांना कोरोनाची लग्न झाली आहे. त्याच वेळी १५४ रुग्ण बरे झाल्यानंतर मंगळवारी घरी परतले. तर ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.