बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली. राज्यात सोमवारी १,९६३ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली होती. तर मंगळवारी हीच संख्या २,३६२ वर पोहोचली. राज्यात सध्या ३१,०६३ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी राज्यात कोरोनावर मात करत ४,२१५ रुग्ण घरी परतेल. तर २० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ११,४३० रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १७,०६ आहे. दम्यान मंगळवारी जिल्ह्यातील विविध भागात १,१७६ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. तर २,२५७ रुग्ण कोरोनावर मात करत घरी परतले. जिल्ह्यात ८ रुग्णांचा मृत्यू कोणामुळे झाला. जिह्यात आतापर्यंत ३९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.