बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटकात कोविड रूग्णांची संख्या साडेसहा लाखांच्या पुढे गेली आहे. मंगळवारी राज्यात ९,९९३ नवीन प्रकरणे नोंदली गेली. आतापर्यंत एकूण ६,५७,७०५ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५,३३,०७४ रुग्णांनी कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे. तर १,१५,१५१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी दिलासा देणारी बाब म्हणजे उपचारानंतर १०,२२८ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ९,४६१ रूग्णांनी आपला जीव गमावला आहे.
मंगळवारपर्यंत राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण ८१.०५ टक्के होते आणि मृत्यूचे प्रमाण १.४३ टक्के होते.
गेल्या २४ तासांत एकूण ९२,४९१ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये ४८,०३५ जलद प्रतिजैविक आणि४४,४५६ आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण ५४,१९,९५४ लोकांच्या तपासण्या झाल्या आहेत.