बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत कमी जास्त होत आहे. लॉकडाऊननंतर सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,५३१ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर १,४३० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात बुधवारी १९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात मंगळवारी चाचणी पॉझिटिव्हिटी दर १.०३ टक्के होता, तर केस मृत्यु दर (सीएफआर) १.२४ टक्के होता.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,९९,१९५ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८,४०,१४७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,४५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २२,५६९ इतकी आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ३७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर याचवेळी २४४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात ३ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.