बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. शेजारील केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह अहवाल बंधनकारक केलं आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,९८७ नवीन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. तर शनिवारी १,६३२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात शनिवारी ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.४३ टक्के होते. तर मृत्यू दर १.८६ टक्के होता.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ४५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर ३७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्यात ११ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.