बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ७० हजारापेक्षा कमी आहे. राज्यात गुरुवारी ३,२०३ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर १४,३०२ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर राज्यात गुरुवारी ९४ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गुरुवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण २.०५ टक्के होते. तर मृत्यू दर २.९३ टक्के होता.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली. जिल्ह्यात गुरुवारी ६७६ रुग्ण आढळले. तर याचवेळी १०,८४० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात १८ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,४७,०१३ वर पोहोचली आहे. तर यापैकी २७,४६,५४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३५,१३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६५,३१२ इतकी आहे.