म्युकरमायकोसिसवर जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये होणार उपचार
बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी, म्युकर मायकोसिस किंवा काळी बुरशीजन्य संसर्ग आता एक साथीचा आजार असल्याचे म्हंटले आहे. आरोग्यमंत्री सुधाकर यांनी कर्नाटकात म्युकर मायकोसिस साथीचा आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच ज्या रुग्णालयात उपचार देण्याची आहे अशा कोणत्याही रुग्णालयाने किंवा वैद्यकीय केंद्राने रुग्णांना प्रवेश नाकारू नये. तसेच जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये होणार आहेत
म्युकर मायकोसिस साथीचा आजार म्हणून केंद्राने अधिकृत घोषणा केली आहे. म्युकर मायकोसिस अथवा ब्लॅक फंगस या आजाराचा केंद्र सरकारने साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये समावेश केला आहे. तेलंगणा आणि राज्यस्थान या राज्यांनी दोन दिवसापूर्वीच या आजाराला महामारी घोषित केले आहे.
दरम्यान आरोग्यमंत्री सुधाकर यांनी, सर्व तज्ञ डॉक्टर आमच्या जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उपलब्ध असल्याने लोक बोरिंग व इतर नियुक्त प्रादेशिक रुग्णालयांव्यतिरिक्त या रुग्णालयांमध्ये म्युकर मायकोसिसवर उपचार घेऊ शकतात.” असे ते म्हणाले.