बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारने शुक्रवारी मेगा कोरोना लसीकरण मोहीम राबविली आणि एका दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्याचा नवा विक्रम केला. राज्यात एका दिवसात प्रथमच २७ लाखांहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. यासह राज्याने पाच कोटींचा आकडाही पार केला. राज्यात आतापर्यंत एकूण ५,१२,५१,१५५ लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, को-विन पोर्टलच्या रात्री ९.३० पर्यंतच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी राज्यभरात एकूण २७,८०,०३२ लोकांचे लसीकरण करण्यात आले. आरोग्य विभागाने एकूण ३१,७५,००० लोकांना लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. राज्यभरात १२ हजाराहून अधिक कोविड लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. बृह बेंगळूर महानगर पालिके (बीबीएमपी) ने परिसरात जास्तीत जास्त ४,०४,४९६ लोकांचे लसीकरण केले.