बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्यात रुग्णांना ऑक्सिजनची कामरता भासत होती. मात्र राज्यात ऑक्सिजनची कमतरता नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अश्वनाथनारायण सीएन यांनी सांगितले आहे.
राज्यात शनिवारी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटानंतर ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली असली तरी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वनाथनारायण सीएन यांनी राज्यात कोणत्याही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता नाही, असे म्हंटले आहे. ऑक्सिजन केंद्रे आणि ऑक्सिजन जनरेटर तैनात करून आम्ही सर्व उपाययोजना करीत आहोत आणि देशाच्या विविध भागातून ऑक्सिजन एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.