बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शनिवारी कोरोना संसर्गाची १,२२९ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३१० नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात २०७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात शनिवारी १,२८९ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर याच वेळी राज्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १८,८९७ इतकी आहे. तर शनिवारी राज्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ०.६६ टक्के होता.
राज्यातील बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. जिल्ह्यात शनिवारी ३१० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ३२९ रुग्ण कोरोनाला हरवून घरी परतले. शनिवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यात मृतांची संख्या ५ होती. तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात ३१२ रुग्ण कोरोनाला हरवून घरी परतले.
राज्याच्या इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण
उडुपीमध्ये १४६, म्हैसूरमध्ये ८२, हसन जिल्ह्यात १०३, कोडगू जिल्ह्यात ७५, चिकमंगळूर जिल्ह्यात ३५, चामराजनगरमध्ये ७, कोलारमध्ये १५, मंड्यामध्ये २१, शिवमोग्गामध्ये ४२, तुमकूरमध्ये ४४, उत्तर कन्नड जिल्ह्यात४२, बेळगावीमध्ये २९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.