बेंगळूर/प्रतिनिधी
शनिवारी कर्नाटकात २,१५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर २,१९८ कोरोना संक्रमित रुग्णांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच राज्यात १७ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८,६०,०८२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ८,२०,५९० जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर राज्यात कोरोनाने आतापर्यंत ११,५०८ जणांचा बळी घेतला आहे. राज्यात सध्या २७,९६५ जण उपचार घेत आहेत.
राज्यात सर्वाधिक रुग्ण हे बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. शनिवारी जिल्ह्यात १,१९५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच ७७१ जणांना कोरोनातून मुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर ९ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १८,१८४ रुग्ण उपचारात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३ ९९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.