बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शनिवारी शुक्रवारच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. शनिवारी राज्यात ४,२७२ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली. त्याचवेळी, राज्यात ६,१२६ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. तर कोरोना संक्रमणामुळे ११५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १,०५,२२६ वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी कोरोना सकारात्मकतेचा दर २.५८ टक्के होता.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बेंगळूर शहरी जिल्ह्यातील ९५५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी शहरातील १,१७४ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. तर १६ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.