बेंगळूर/प्रतिनिधी
शनिवारी कर्नाटकमधील कोरोनाचे प्रमाण वाढले. राज्यात शनिवारी ९ हजाराहून अधिक बाधित रुग्णांची भर पडली. दरम्यान राज्यात ९,८८६ नवीन संक्रमणांची पुष्टी झाली आहे. त्याचप्रमणे राजधानी बेंगळूरमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या ३,९२५ होती. तर शनिवारी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,९८९ होती. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ११२७८३ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात मृतांची संख्या १०० होती, त्यातील २१ जण बेंगळूरमधील आहेत.