बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढतच आहे. राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. शुक्रवारी राज्याला दिलासा देणारी बाब म्हणजे १० हजाराहून अधिक रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोना संसर्गाची ८,६२६ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याच वेळी घरी परतणार्या लोकांची संख्या १०,९४९ होती. दरम्यान राजधानी बेंगळूरमध्ये कोरोनाची ३,६२३ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे १,०१,१२९ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी राज्यात १७९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी राज्यात ५७,४५७ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.