बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे अनेक तज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारने संभाव्य तिसऱ्या लाटेपुर्वी राज्यातील १.५ कोटी मुलांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री के सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई ‘आरोग्य नंदना’ उपक्रम एका आठवड्यात सुरू करणार आहेत, असे ते म्हणाले.
“राज्यातील १.५ कोटीपेक्षा जास्त मुलांची कोविड चाचण्या केल्या जातील, यामुळे आम्हाला कमी प्रतिकारशक्ती आणि इतर सह-आजार असलेल्या मुलांना ओळखण्यास मदत होईल. त्यानंतर त्यांना रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार आणि पूरक आहार दिला जाईल आणि त्यांचे आरोग्य चांगले राहील. सतत निरीक्षण केलेजाईल, ” असे मंत्री सुधाकर म्हणाले.
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर कठोर ताशेरे ओढले होते. कोरोना फैलावास केवळ आयोगच जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने आयोगाला फटकारले होते.