बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान राज्यात सध्या कोविडच्या सक्रिय रूग्णांची संख्या ७८ हजारांच्या पुढे गेली आहे. यापैकी ४७४ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. राज्यात कोरोना सकारात्मकतेचा दर ७.२० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
गेल्या २४ तासात राज्यात ८,७७८ कोविड रुग्ण आढळले, तर ६०७९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मत करत रुग्णालयातून घरी परते आहेत. राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या एकूण १०,८३,६४७ वर पोहोचली आहे. तर यापैकी ९,९२,००३ व्यक्तींनी कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे. कोविडमुळे राज्यात आतापर्यंत एकूण १३,००८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मंगळवारी ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ५५५ मृत्यू बेंगळूर शहरात झाले आहेत.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मंगळवारी जिल्ह्यात ५,५०० रुग्णांची नोंद झाली. यासह जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या ४,९३,८६९ वर पोहोचली आहे. तर यापैकी ४,३१,३८३ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४,९१० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात ५७,५५७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाने गेल्या २४ तासांत राज्यात एकूण १,२१,८९९ नवीन नमुन्यांची चाचणी केली, ज्यात १०,८८३ जलद प्रतिजैविक आणि १,११,०१६ आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.