बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात (karnataka) सप्टेंबरमध्ये विक्रमी लसीकरण (vaccination) करण्यात आले आहे. राज्यात ३० दिवसांत १.३ कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आल्यामुळे कर्नाटकने ऑगस्टमध्ये १.२ कोटी डोसच्या विक्रमला मागे टाकत सप्टेंबरमध्ये नवीन लसीकरण विक्रम केला आहे. दरम्यन, राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्यसरकारने याआधी केंद्राकडे वाढीव लसीचा (vaccine) पुरवठा करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (Basavaraj Bommai Chief minister of Karnataka) यांच्या दररोज ५ लाख डोसच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टापेक्षा कमी लसीकरण झाले आहे. दररोज ५ लाख डोस आले तर महिन्याला एकूण १.५ कोटी डोस होतात. यासाठी दिवसाला ५ लाखांपेक्षा जास्त डोस दिले गेले पाहिजे. राज्याने सप्टेंबरमध्ये सहा दिवसात ५ लाखांहून अधिक डोस दिले, ज्यात १७ सप्टेंबरला विक्रमी ३१.७ लाख डोसचा समावेश आहे. तथापि, इतर २४ दिवसांपैकी, राज्याने ७ सप्टेंबरला ४ लाख डोस दिले गेले. तर नऊ दिवस ३ लाख पेक्षा जास्त डोस दिले आ