बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारापेक्षा कमी राहिली. तथापि, कोरोना पॉझिटिव्ह दर टीपीआर) गेल्या २४ तासात २.५८ टक्क्यांवरून ३.२५ टक्क्यांपर्यंत वाढला.
दरम्यान राज्यात सोमवारी ४,८६७ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली. यासह राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २८, ११,३२० वर पोहोचली असून त्यापैकी २६,५४,१३९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यापैकी ८,४०४ रुग्ण सोमवारी कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या १,२३,१३४ रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात कोविडमुळे आतापर्यंत एकूण ३४,०२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सोमवारी १४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात, मृत्यूचे प्रमाण १.२१ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९४.४० टक्के आहे.
दरम्यान, बेंगळूर शहरी जिल्ह्यात सोमवारी १,०३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १२,०६,२९३ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ११,२०,५०७ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ७०,३१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविडमुळे आतापर्यंत १५,४७३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २८ रुग्णांचा मृत्यू सोमवारी झाला. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८८ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण १.२८ टक्के आहे.