बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकाला केंद्राकडून ऑक्सिजन पुरवठा सुरु असून राज्याला आतापर्यंत ६ ऑक्सिजन ट्रेनद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला आहे. शुक्रवारी बंगळूरमध्ये वाजता सहावी ऑक्सिजन एक्सप्रेस इनलँड कंटेनर डेपो व्हाईटफील्ड येथे पोहोचली. ही गाडी गुरुवारी गुजरातहून निघाली होती. ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेनला वेग देण्यासाठी ग्रीन कॉरीडोर बनविण्यात आला. राज्यांना ऑक्सिजन पूर्वथकरण्यासाठी ही ट्रेन सतत चालविली जात आहे. या ऑक्सिजन ट्रेनमध्ये ४ क्रायोजेनिक कंटेनर आहेत आणि एकूण ७२.९४ टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन या एक्सप्रेसमधून आला आहे. आता सातवी आणि आठवीही ऑक्सिजन एक्सप्रेस लवकरच बेंगळूरमध्ये दाखल होणार आहे.
कर्नाटकात आतापर्यंत ७१२.९४ टन द्रव मेडिकल ऑक्सिजन रेल्वेने आला आहे. रेल्वेने आतापर्यंत २०८ ऑक्सिजन एक्सप्रेस चालविल्या आहेत आणि देशभरात ८१४ टँकरद्वारे सुमारे १३,३१९ टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.