बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली. राज्यात सोमवारी १,९६३ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली. सोमवारी राज्यात कोरोनातून बरे होऊन २,६८६ रुग्ण घरी परतले. राज्यात सध्या ३२,९३६ रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी एकूण १९ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत ११,४१० जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात बेंगळूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. बेंगळूर शहरी जिल्ह्यात १८,३९५ रुग्ण उपचारात आहेत. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचे ९७८ रुग्ण सापडले. तर ९५९ रुग्णांना कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. तर ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत ३,९५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.