बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाचा प्रसार कमी होण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात सोमवार पासून १४ दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन सुरू झाला आहे.दरम्यान, मंत्री अरविंद लिंबावळी यांनी राज्यातील दहा जिल्ह्यांमधील कोविड-१९ रुग्णांच्या पूर्ण शारीरिक चाचण्यांसाठी प्रभागस्तरीय प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली.
दहा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी शहरी भागात प्रभागस्तरीय प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे, असे सांगितले.
वन विभाग व कन्नड-संस्कृती आणि कोविड वॉर रूम कॉल सेंटरचे नोडल मंत्री लिंबावळी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की ही केंद्रे उघडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मानवी संसाधनांसह इतर सुविधा आहेत का ते तपासा व त्वरित त्यासंदर्भात हिती द्या, असे सांगितले. दक्षिण कर्नाटक, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, दावणगिरी, बेळगाव, शिवमोगा, उडुपी, कोडगू आणि मंड्या येथील उपायुक्त या व्हिडिओ कॉन्फरन्सला उपस्थित होते.