प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटकात १४ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी घेतला आहे. दरम्यान, आज सायंकाळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ही घोषणा केली.
दरम्यान, कर्नाटकमधील कोरोना परिस्थिती पूर्ण नियंत्रणात नसल्याने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी ७ जूनपर्यंत असणारा लॉकडाऊन वाढवून १४ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, तज्ञांच्या सल्ल्यावर आधारित लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.” यापूर्वी कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने (टीएसी) ७ जूननंतरही कर्नाटकात लॉकडाऊन कायम ठेवण्याची शिफारस केली होती.
दरम्यान, येडियुरप्पा यांनी ५०० कोटींच्या दुसर्या कोविड -१९ मदत पॅकेजची घोषणा केली आहे.