बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी आपल्या दौऱ्यात राज्यातील समस्येविषयी केंद्रीय मंत्र्यांच्या गती भेटी घेतल्या. गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य मंत्र्यांना कर्नाटकाला दररोज कोविड लसीचे ५ लाख डोस पुरवण्याची विनंती केली. तसेच आरोग्य मंत्र्यांनीही त्यांची मागणी केली आहे. याविषयी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी सांगितले की, केंद्र सरकारच्या मदतीने १ सप्टेंबरपासून दररोज राज्य किमान पाच लाख जणांचे लसीकरण केले जाणार आहे.
दरम्यान, “आम्ही बुधवारी चाचणीच्या आधारावर पाच लाख जणांचे लसीकरण केले. आता आम्ही १ सप्टेंबरपासून दररोज पाच लाख जणांचे लसीकरण करू,” असे दिल्ली भेटीवरून परतल्यानंतर बोम्माई यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
ते म्हणाले की त्यांची दिल्ली भेट मुख्यत्वे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना भेटण्यासाठी आणि सप्टेंबरपासून दररोज पाच लाख नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यासाठी केंद्राचा पाठिंबा घेण्यासाठी होती. मांडविया यांनी लस देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र राज्याच्या लसीकरणावर आधारित लसींचा पुरवठा करेल, असेही बोम्माई म्हणाले.