बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात २०१५ पासून उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ येथे राहणाऱ्या पाकिस्तानी महिलेला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. ती याठिकाणी पती आणि तीन मुलांसमवेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास आहे.
२०१४ मध्ये दुबईत येथून मोहिद्दीन रुक्कुद्दीनशी विवाह करणार्या खदिजा मेहरिन (वय ३३) हिला पोलिसांनी अटक केली. मेहरिनला न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती भटकळ पोलिसांनी दिली.
दरम्यान माध्यमांशी बोलताना उत्तर कन्नडचे पोलिस अधीक्षक शिवप्रकाश देवराजू यांनी अटकेची माहिती दिली. “खदिजा बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाली आणि भटकळमधील नवथ कॉलनी येथे आपल्या पतीबरोबर राहिली. दुबई येथे मोहद्दीन रुक्कुद्दीनशी लग्नानंतर २०१५ मध्ये खदिजा बेकायदेशीरपणे भारतात आली आहे, ”असेही ते म्हणाले.