बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण संथ गतीने सुरु होते. तसेच राज्य सरकारने लसीच्या अभावामुळे १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण थांबविले होते, ते आता पुन्हा सुरु होणार आहे. राज्यात २२ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण पुन्हा सुरु केले जाणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने एका आठवड्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील कोविड -१९ लसीकरण तात्पुरते स्थगित केले होते. आता राज्यात लसीचा पुरवठा सुरळीत होत असल्याने कर्नाटक सरकारने गुरुवारी २२ मेपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले.
“राज्यात २२ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरू होईल. तसेच राज्य सरकार-आघाडीच्या कामगारांना प्रथम लसीकरण करेल, ”असे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी एका ट्वीट करत माहिती दिली आहे.